Pune : अग्निशमन दलाच्या जवानाला कोरोनाची लागण

Pune: A fire brigade jawan detected Corona positive

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट वाढत असून ते काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. पुण्याच्या अग्निशमन दलातील 50 वर्षीय जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात खळबळ उडाली आहे.

पुणे शहरात पोलीस, डॉक्टर पत्रकार यानंतर आता अग्निशमन जवानालाही कोरोना झाला आहे. या कर्मचाऱ्याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याची करोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यांनतर या जवानाला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर उपचार सुरु असून या जवानाच्या संपर्कात आलेल्याची माहिती घेणे सुरू आहे.

अग्निशमन दलात पहिलाच कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने इतर जवनांनाही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून 14 नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. या रोगामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या आता 141 झाली आहे. तर, 86 जण गंभीर आहेत.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे आता 2537 रुग्ण झाले आहेत. 762 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुढील 2 आठवडे आणखी कोरोनाचे रुग्ण वाढणार असल्याचा इशारा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.

सध्या कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. दररोज तब्बल 1500 चाचण्या करण्याचे नियोजन सुरू आहे. मध्यवर्ती भागांत कोरोनाचे बळी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.