Pune: डॉक्टर, पोलीस, महापालिका यांच्या प्रयत्नांमुळे कोरोना आटोक्यात- गिरीश बापट

Pune: Corona is under control due to efforts of doctors, police, Municipal Corporation - Girish Bapat

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिका, प्रशासकीय अधिकारी, पोलीस कोरोनाच्या परिस्थितीशी सामना करत असल्याबद्दल खासदार गिरीश बापट यांनी धन्यवाद दिले. ते घेत असलेल्या परिश्रमामुळे कोरोना पुण्यामध्ये आटोक्यात येत आहे. सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधीतून 50 लाख रुपयांचे कोवीड – 19 साठी वैद्यकीय साहित्याचे वाटप पुणे महानगरपालिका व पुणे पोलिसांना गिरीश बापट यांच्या हस्ते नारायण पेठेतील लोकमान्य सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने होते.

कार्यक्रमास सभागृहनेते धीरज घाटे, उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली साबणे, कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय अधिकारी आशिष महाडदळकर, भवानी पेठ क्षत्रिय अधिकारी बनकर, पोलिस प्रशासन अधिकारी, मतदार संघातील सर्व नगरसेवक, अध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्षा उपस्थित होते.

प्रास्ताविक मुक्ता टिळक यांनी केले. भाजप कसबा मतदार संघ अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी सूत्रसंचालन केले. महिला अध्यक्ष वैशाली नाईक यांनी आभार मानले.

दरम्यान, पुण्यात सातत्याने कोरोना रुग्ण वाढत असल्याने महापालिका पदाधिकाऱ्यांनीही क्षेत्रीय स्तरावर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहे. पुण्यात रोजच 200 रुग्ण वाढते आहे. प्रशासनातर्फे सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.