Pune : शहरात आज कोरोनामुळे 25 जणांचा मृत्यू, 169 जणांना डिस्चार्ज, 266 नवे रुग्ण

Corona killed 25 people, discharged 169, and 266 new patients in the city today

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनामुळे आज, मंगळवारी तब्बल 25 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 12 महिला आणि 13 पुरुषांचा समावेश आहे. 169 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात 266 नवीन रुग्णांची नोंद झाली.

शहरात कोरोनामुळे आतापर्यंत 345 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात कोरोनाचे एकूण 6 हजार 795 रुग्ण असून, यातील 4 हजार 119 बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 2 हजार 331 जणांवर उपचार सुरू आहेत. 165 क्रिटिकल रुग्ण असून, 35 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

वर्षीय महिलेच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, मंगळवार पेठेतील 79 वर्षीय पुरुषाचा वायसीएम हॉस्पिटलमध्ये, लक्ष्मीनगर हडपसरमधील 60 वर्षीय आज झालेल्या मृत्यूंमध्ये जनता वसाहतमधील 78 वर्षीय पुरुषाचा व जनवाडीमधील 51 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, वडारवाडीतील 54 पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

तसेच रास्ता पेठेतील 77 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, शिवाजीनगरमधील 56 वर्षीय व गुलटेकडीतील 68 वर्षीय महिलेचा आणि गणेश पेठेतील 78 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 60 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, रामटेकडी हडपसर भागातील 45 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

हेल्थ कॅम्पमधील 43 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 72 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, रामटेकडीमधील 51 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 55 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 62 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, वानवडीमधील 70 वर्षीय महिलेचा पुना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

त्याचबरोबर हडपसरमधील 60 वर्षीय महिलेचा, ताडीवाला रोड भागातील 65 वर्षीय पुरुषासह न्यू मुंढव्यातील 46 वर्षीय पुरुषाचा व येरवड्यातील 40 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, तर कोंढाव्यातील 86 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 76 वर्षीय महिलेचा पुना हॉस्पिटलमध्ये, दौंडमधील 65 वर्षीय महिलेचा वायसीएम हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.