Pune: कोरोनाचे दोन दिवसांत 60 बळी; तिशी, चाळिशीतील रुग्णांचाही होतोय मृत्यू

Pune: Corona kills 60 in two days; ages of Thirty, forty patients are also dying पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण नऊ मार्चला सापडला होता. त्यानंतर 30 मार्चला पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता.

एमपीसी न्यूज- पुण्यात मागील दोन दिवसांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत वयाची साठी ओलांडलेले रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असल्याचे दिसत होते. पण आता चाळीशीतील रुग्णांचा ही कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचे स्पष्ट होते. पुण्यात बुधवारी 32 आणि गुरुवारी 28 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 30 ते 40 वयोगटातील सहा रुग्णांचाही समावेश आहे. पुणे महापालिकेत जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण नऊ मार्चला सापडला होता. त्यानंतर 30 मार्चला पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. पुण्यात आतापर्यंत एकूण 786 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 193 मृत्यू हे मागील दहा दिवसांत झाल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

आतापर्यंतच्या माहितीनुसार कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचे वय साठहून अधिक असायचे. अशा रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असे आजार असल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. पण मागील काही दिवसांपासून वयाच्या तिशी आणि चाळिशीतले रुग्णही मृत्युमुखी पडल्याचे महापालिकेच्या अहवालात नोंद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.