Pune Corona Update : पुन्हा कोरोनाचा चढता आलेख! शहरात नवीन 5 हजार 271 कोरोना रुग्ण; 7 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज सुद्धा वाढ पाहायला मिळाली. शहराच्या विविध भागातील 5 हजार 271 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 6 हजार 299 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे शहरातील सात रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 206 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 6 लाख 15 हजार 027 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 45 हजार 267 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 5 हजार 271 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 13 हजार 225 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 42 लाख 62 हजार 732 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख पुन्हा चढता आलेख पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.