Pune Corona Update : कोरोना रुग्णसंख्या घटली! शहरात नवीन 2 हजार 110 कोरोना रुग्णांची नोंद; 3374 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमालीची घसरली असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. शहराच्या विविध भागातील 2 हजार 110 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 3 हजार 374 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

कोरोनामुळे शहरातील 10 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 280 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 6 लाख 48 हजार 592 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 20 हजार 752 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 2 हजार 110 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 9 हजार 118 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 43 लाख 76 हजार 575 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख कमालीचा घसरला असला तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.