Pune Corona News : दिलासादायक ! कधीकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात आज एकही मृत्यू नाही

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. कधीकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरासाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला असून, जवळपास आठ महिन्यानंतर आज पुणे शहरात कोरोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नाही. पुणेकरांना निश्चितच दिलासा देणारी ही बाब आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

‘पुण्यात आज एकही करोनाबाधित मृत्युची नोंद नाही, पुणे मनपा हद्दीत करोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही करोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. 6 फेब्रुवारी 2021 नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.’ असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.