Pune Corona Updates : कोरोनाचे संकट वाढले! शहरात आज 4 हजार 029 नवे नवीन रुग्ण 

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (रविवारी, दि. 9) दिवसभरात 4 हजार 029 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 688 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 5 लाख 26 हजार 035 एवढी झाली आहे. तर आजवर 5 लाख 02 हजार 018 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरातील 9 हजार 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 14 हजार 890 रुग्ण सक्रिय आहेत. आज नव्याने 4 हजार 029 रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 18,012 कोविड टेस्ट केल्या असून आतापर्यंत 39,77, 381 टेस्ट करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाकडून नवी कोविड नियमावली लागू करण्यात आली असून आज रात्री 10 पासून याबाबत अंमलबजावणी सुरू होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.