Pune Corona News : शहरात कोरोनाचा जोर कायमच! आज 4 हजार 857 रुग्णांची नव्याने नोंद

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी वाढ पाहायला मिळाली. शहराच्या विविध भागातील 4 हजार 857 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1 हजार 805 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुळे शहरातील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 131 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 5 लाख 37 हजार 418 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 22 हजार 503 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 4 हजार 857 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.
पुणे कोरोना अपडेट : बुधवार, दि. १२ जानेवारी २०२२
◆ उपचार सुरु : २२,५०३
◆ नवे रुग्ण : ४,८५७ (५,३७,४१८)
◆ डिस्चार्ज : १,८०५ (५,०५,७८४)
◆ चाचण्या : २०,८०१ (४०,२८,३०४)
◆ मृत्यू : १ (९,१३१)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/ZYQOSq2DRY— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 12, 2022
तर, शहरात आज दिवसभरात 20 हजार 801 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 40 लाख 28 हजार 304 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.