Pune Corona News : बाणेर आणि दळवी रुग्णालयातील 60 बेड रिकामे

एमपीसीन्यूज : जम्बो बाणेर आणि दळवी रुग्णालयातील 60  बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या परंतु अद्यापही देखरेखीची गरज असलेल्या अशा 60 रुग्णांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) वसतिगृहामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि जास्तीत जास्त रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या पहिल्या लाटेत फायदेशीर ठरलेले शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू केले असून, त्या ठिकाणी 700 बेड कार्यान्वित केले आहेत.

या ठिकाणी काही दिवस कोरोना रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवल्यानंतर ऑक्सिजनची गरज लागत नाही. मात्र, पुढील काही दिवस त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या ठिकाणी सध्या जम्बोतील 30, बाणेर येथील कोविड रुग्णालयातील 12,  दळवी रुग्णालयातील 8  आणि इतर 10  अशा 60  रुग्णांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या 200  बेडमुळे पालिकेच्या रुग्णालयातील बेड इतर रुग्णांसाठी वापरण्यास मिळणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.