Pune Corona News : सिंहगड रोड परिसरात कोरोनाचे तब्बल 10 हजार रुग्ण

एमपीसी न्यूज – सिंहगड रोड परिसरात कोरोनाचे तब्बल 10 हजार  रुग्ण झाले आहेत. जनता वसाहत, दांडेकर पूल, दत्तवाडी, गांधी वसाहत, हिंगणे, विठ्ठलवाडी, आनंदनगर-माणिकबाग, वडगाव बुद्रुक, धायरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. 

कोरोना रुग्णवाढीमध्ये सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असलेला भाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर २३६ रुग्णांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नऊ हजार कोरोनाबाधित रुग्ण उपचार करून बरे झाले आहेत, अशी माहिती क्षेत्रीय कार्यालयाकडून देण्यात आली.

सिंहगड रस्ता परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी पु. ल. देशपांडे उद्यानातील केंद्र, कै . मुरलीधर लागयुडे रुग्णालयात आणि धायरी येथील पोकळे शाळेत चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या होत असल्याने रुग्ण आढळून येत आहेत.

या रुग्णांवर वेळीच उपचार करणे सोपे होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोरोना होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.