Pune Corona News : पुण्यातील सहायक पोलीस उपनिरिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे पोलीस दलातील आणखी एका कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सहायक उपनिरीक्षक मंगेश बिचे (वय 56) असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते नियंत्रण कक्षात नेमणुकीस होते. त्यांच्या मृत्यूमुळे पुणे पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

मंगेश बिचे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे त्यांच्या मुलाचादेखील मृत्यू झाला होता. मुलाच्या आकस्मिक मृत्यूमुळे दुःखात असताना मंगेश बिचे यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. अशाप्रकारे काही दिवसांच्या अंतराने बाप लेकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुणे पोलीस दलातही कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत 14 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.