Pune Corona News : दिलासादायक ! पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र घटले, ‘इतक्या’ इमारती आहेत प्रतिबंधित

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील कोरोना रुग्ण संख़्या वाढत असतानाच सोसायटीत 20 पेक्षा अधिक आणि इमारतीत 5 पेक्षा अधिक कोरोनाबाधित असलेल्या इमारती सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्या जात आहेत. मागील सलग तीन आठवडे शहरात प्रत्येक आठवड्याला नव्याने 100 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची वाढ होत होती. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 600 पर्यंत जाऊन पोचली होती ती आता 314 प्रतिबंधित क्षेत्रावर येऊन पोचली आहे.

शहरात 10 फेब्रुवारीपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सुरुवात झाली. त्यानंतर शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून शहरातील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे, परिणामी शहरात रुग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेकडून रुग्ण आढळलेला भाग बंद न ठेवता, सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यात, प्रामुख्याने शहरातील मोठमोठ्या आणि नामांकित सोसायट्यांचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरात 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक करोना रुग्ण सौम्य लक्षणे असलेले अथवा लक्षणे नसलेले होते. त्यामुळे ते घरीच विलगीकरणात राहात होते. त्यानंतर रुग्णसंख्या वाढतच असल्याने, तसेच विलगीकरणातील रुग्ण बाहेर पडत असल्याने त्यांच्याकडून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे समोर आले.

16 एप्रिलअखेरसूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्राची संख्या 497 होती. तर, त्यापूर्वी सलग तीन आठवडे ही क्षेत्रांची संख्या आठवड्याला 100 ने वाढत होती. मात्र, 17 एप्रिलपासून नवीन करोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असून बाधितांचा आकडाही उतरणीला लागला आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रातील रूग्ण बरे होत आहेत, तो भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात येत आहे.

परिणामी, शहरात आता 314 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आहेत. त्यात, 75 इमारती तर 174 सोसायट्यांचा समावेश आहे. तर इतर 65 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.