Pune Corona News : कोरोना रुग्णसंख्या घटल्याने लोहगाव कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय !

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने पुणे महानगरपालिकेने लोहगाव, विमान नगर परिसरात उभारलेलं 3500 क्षमतेचे कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (शुक्रवारी) हे कोविड केअर सेंटर बंद करण्यात आल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली.

तब्बल साडेतीन हजार रुग्ण क्षमतेचं असलेलं लोहगाव एसआरए कोविड केअर सेंटर पुणे महापालिका, बजाज फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना अशा सामाजिक संस्थेच्या मदतीने चालवले जात होते.

परंतु, मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मनुष्यबळ आणि वाढत्या खर्चाचा विचार करून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आले.

कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे शहरातील हॉस्पिटलमधील काही बेड अक्षरशः रिकामे पडून आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटर चालविण्याचा खर्च मनुष्यबळाचे व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा विचार करता हे कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, जम्बो कोविड केयर सेंटर सुरूच राहणार आहे. तसेच दुसरी लाट येण्याची शक्यता वाटली, तशी परिस्थिती उद् भावली तर बंद केलेली सर्व कोविड केयर सेंटर पुन्हा सुरू करू शकतो, असा विश्वास अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.