Pune Corona News : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुण्यातील ई-झेस्टचा मदतीचा हात

पुणे महानगरपालिकेला व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत

एमपीसीन्यूज : पुण्यातील ई-झेस्ट या सॉफ्टवेअर कंपनीने पुणे महानगरपालिकेला 5 व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांची मदत केली आहे. कोविड 19 च्या सध्याच्या महामारीच्या काळात देशाच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी देशाची ऑक्सिजनची गरज पूर्ण करणे व आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या उद्देशाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर अर्थात एमसीसीआयए यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या मिशन वायु अंतर्गत ई-झेस्टच्या वतीने ही मदत करण्यात आली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, उपमहापौर सुनीता वाडेकर, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने, एमसीसीआयएच्या कार्यकारी समितीचे सदस्य व माहिती तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, मायलॅब संस्थेचे सुजित जैन आणि ई झेस्ट संस्थेच्या डॅलिया दत्ता आदी या वेळी उपस्थित होते.

या संदर्भात ई-झेस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र देशमुख म्हणाले की, कोविडच्या दुस-या लाटेमध्ये देशभरातील आरोग्य व्यवस्था बिकट परिस्थितीमधून जात असताना आवश्यक वैद्यकीय उपकरणांची कमतरता भरून काढण्याच्या उद्देशाने मिशन वायूसाठी एमसीसीआयएच्या वतीने पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड-19 रिस्पॉन्स (पीपीसीआर) या व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे.

या अंतर्गत आरोग्य तंत्रज्ञान पुरविणारी संस्था म्हणून पुण्यात काम करीत असताना सामाजिक जाणीवेतून आम्ही पुणे महानगरपालिकेला १५ लाख रुपये किंमतीची उच्च दर्जाचे ५ BiPAP व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांची मदत करीत आहोत. महानगरपालिकेच्या माध्यमातून याचा फायदा आता गरजू रुग्णांना होणार असल्याने याचे आम्हाला समाधान आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.