Pune Corona News : कोविडविरुद्धचा लढा सक्षपमपणे सुरु : महापौर मोहोळ

महापौर निधीतून शहराला ९ रुग्णवाहिका उपलब्ध; २ कार्डियाक रुग्णवाहिकेचाही समावेश

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला महापालिका सक्षमपणे करत असून आरोग्य तंत्रणा अधिकाधिक मजबूत प्रयत्न करत आहोत. त्याचाच भाग म्हणून महापौर विकास निधीतून शहराला 9  रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी कोणतीही तडजोड करणार नाही, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

महापौर मोहोळ यांच्या महापौर विकासनिधीच्या माध्यमातून पुणे शहरासाठी ९ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या असून याचे लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या 9 रुग्णवाहिकांमध्ये 2  अद्ययावत अशा कार्डियाक, 2  रुग्णवाहिका आणि 5 शववाहिकांचा समावेश आहे.

या लोकार्पणावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर, आयुक्त विक्रम कुमार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शहर सुधारणा समिती अध्यक्ष आनंद रिठे, क्रिडा समिती अध्यक्ष अजय खेडेकर यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

महापौर पुढे म्हणाले, ‘पुणे शहरात कोरोनाची साथ आल्यापासून आजतागायत आपण कोरोना निर्मूलन आणि उपाययोजना करण्यासाठी एक रुपयाचाही निधी कमी पडू दिला नाही. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच आरोग्य व्यवस्थाही वाढवण्याचा प्रयत्न आपण कायम केला आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तम दर्जाच्या रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत’.

नवी रुग्णसंख्या घटतेय, पण ढिलाई नको : महापौर

पुणे शहरात गेल्या पाच दिवसांत नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे एक्टिव्ह रुग्णसंख्या घटत आहे. हे सामूहिक प्रयत्नांचे यश असले तरी पुणेकरांनी नियमांच्या बाबतीत कोणतीही ढिलाई करु नये. कारण आपल्याला अजून मोठी लढाई लढायची आहे’, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.