Pune Corona News : महापालिकेच्या कोविड हेल्पलाईनवर ‘बेड उपलब्ध नाहीत’ ही कॉलरट्यून ठेवा – रुपाली चाकणकर

एमपीसीन्यूज : पुणे महानगरपालिकेच्या कोविड हेल्पलाईनने कॉलर ट्यून म्हणून ‘बेड उपलब्ध नाहीत, आत्मनिर्भर व्हा’ हे वाक्य ठेवलं पाहिजे, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे लगावला.

आपल्या ट्विटमध्ये चाकणकर म्हणाल्या, पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. पुण्याचे महापौर मात्र खोट्या आकडेवारीची धूळफेक करण्यात व्यस्त आहेत. माहितीच्या अभावी होणारी रुग्णांची फरफट थांबवण्यासाठी महापालिकेने डॅशबोर्डवर माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे असते.

_MPC_DIR_MPU_II

प्रत्यक्षात मात्र महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर चुकीची माहिती उपलब्ध असल्याचं निदर्शनास आलं आहे. प्रत्यक्षात कुठेही बेड उपलब्ध नसताना डॅशबोर्डवर अनेक बेड्स उपलब्ध असल्याचं पुणे महानगरपालिकेतर्फे दाखवण्यात आलं.

पुणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा हा बुरखा काल मुंबईत उच्च न्यायालयात फाटला. पुणे महानगरपालिकेची ही लबाडी उच्च न्यायालयात उघडकीस आल्याने सर्व पुणेकरांची मान शरमेने खाली गेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.