Pune Corona News : सोमवारपासून पुणे शहरात नवे निर्बंध, जाणून ‘घ्या’ नवी नियमावली

एमपीसीन्यूज : पुणे शहरात कोरोनाची संख्या पुन्हा वाढू लागल्याने तसेच डेल्टा व्हायरसचा धोका राज्यात पुन्हा निर्माण झाल्याने येत्या सोमवारपासून (दि . 28) पुणे शहरात नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.

या नियमावलीनुसार खालील निर्बंध शहरात राहणार आहेत

सर्व अत्यावश्यक दुकाने सर्व दिवस दुपारी चारपर्यंत खुली राहणार

– अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरु. शनिवार-रविवार पूर्ण बंद

– माॅल, सिनेमागृहे पूर्ण बंद

– रेस्टाॅरंट, बार, फूट कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार. त्यानंतर व शनिवारी आणि रविवारी रात्री ११ पर्यंत पार्सल सेवा व होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार

– सार्वजनिक ठिकाणे (उद्याने) खुली मैदाने, सायकलिंग आठवड्यातले सर्व दिवस सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहणार

– जीम, स्पा पूर्वनियोजित वेळेनुसार दुपारी ४ पर्यंत सुरु राहणार

– सूट देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व कार्यालये ५० टक्के क्षमतेने दुपारी चारपर्यंत सुरु राहणार

– शाळा, महाविद्यालये १५ जुलैपर्यंत बंद राहणार

– पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार

– मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार. शनिवार, रविवारी होम डिलिव्हरीला परवानगी

सार्वजनिक व अन्य कार्यक्रमांसाठी –

– सामाजिक, धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत करता येणार

– या कार्यक्रमांचा कालावधी ३ तासांपर्यंत मर्यादित

– सदर ठिकाणी खाद्यपदार्थ सेवनाला बंदी

– धार्मिक स्थळे पूर्ण बंद, पुजा अर्चा सुरु राहणार

– लग्न समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत परवानगी

– अंत्यसंस्कार, दशक्रिया विधींना २० जणांची उपस्थिती

इन सिटू बांधकामांना परवानगी राहणार आहे. ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय नाही, अशा ठिकाणी दुपारी ४ पर्यंत बांधकामांना परवानगी राहील. ई सेवा (ई काॅमर्स) सुरु राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.