Pune Corona News: आता ‘हे’ आहेत शहरातील नवे मायक्रो कनटेन्मेंट झोन!

एमपीसी न्यूज – शहरातील विभागनिहाय कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन पुणे महानगरपालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची म्हणजे मायक्रो कनटेन्मेंट झोनची पुनर्रचना केली आहे. आता शहरात 71 मायक्रो कनटेन्मेंट झोन असणार आहेत. त्याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढला आहे.

महापालिकेने तीन सप्टेंबर रोजी शहरातील 74 मायक्रो कनटेन्मेंट झोनची यादी जाहीर केली होती. त्यापैकी 25 कनटेन्मेंट झोनमधील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने त्यांना नव्या यादीतून वगळण्यात आले आहे तर सक्रिय रुग्ण संख्या वाढलेल्या 22 भागांचा मायक्रो कनटेन्मेंट झोनच्या यादीत नव्याने समावेश करण्यात आला आहे.

सोबत महापालिकेने यासंदर्भात जारी केलेला संपूर्ण आदेश आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. जाणून घ्या शहरातील नवे कनटेन्मेंट झोन….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.