Pune Corona News :  पुणे महापालिका अंत्यसंस्कारासाठी नवीन जागेच्या शोधात !

एमपीसीन्यूज  :   सध्याच्या स्थितीत शहरातील स्मशानभूमीमध्ये अहोरात्र अंत्यसंस्कार होत आहेत. दुर्देवाने यापेक्षा वाईट परिस्थिती ओढवली तर नागरी वस्तीपासून दूरच्या जागेचा शोध घेउन त्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेकडून चाचपणी सुरु आहे. 

कोरोना रुग्णांची संख्यावाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. दुसरीकडे नैसर्गिक आणि अपघाती मृत्यूही होत आहेत. या कारणांमुळे शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये वेटिंग वाढले आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मागील काही दिवसांपासून मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 50 च्या पुढे गेली आहे.

कोरोनामुळे मरण पावलेल्यांनंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यास आवधी लागतो. त्यामुळे स्मशानभूमीतील वेटींग वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व स्मशानभूमींमध्ये कोवीड मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची निर्णय घेतला आहे.

शहरात 21 स्मशानभूमी आहेत. त्यात 10 विद्युत व 13 गॅस दाहिनी आहेत. दोन दिवसांपुर्वी अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांची संख्या 145 पर्यंत गेल्याने वैकुंठ स्मशानभूमीतही पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास सुरूवात केली आहे.

कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांसह दररोज 100 हून अधिक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत आहेत. आतापर्यंत वैकुंठ स्मशान भूमी वगळता अन्य सात ठिकाणी असलेल्या विद्युत दाहिनी व गॅस दाहिनींमध्ये अंत्यसंस्काराला प्राधान्य देण्यात येत होते. परंतू संख्या वाढू लागल्याने शनिवारपासून वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.