Pune Corona News : धककादायक ! पुण्यातील पॉझिटिव्हीटी रेट 14 टक्क्यांवर पोहचला

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि उपनगरातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधितांची आकडेवारी प्रतिदिन 500 चा टप्पा गाठत आहे. परिणामी पॉझिटिव्हीटी रेट काही दिवसांतच 10 टक्क्यांवरून 14 टक्यांपर्यंत गेल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.

पुणे महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ.आशिष भारती म्हणाले, गेल्या दोन आठवड्यात पुणे शहरात अचानक कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये पॉझिटिव्ही रेट 10 ते 12 टक्के इतका होता. तो 14 टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हीटी रेट गेला आहे.

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर आणि उपनगरात काही ठिकाणी पुन्हा कोविड केयर सेंटर सुरू केले आहेत. खराडी रक्षकनगर, स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा केंद्र आणि पठारे स्टेशन येथे 600 बेडचे कोविड केयर सेंटर सुरू केले आहेत.

नागरिकांनी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक आंतर पालन करून सहकार्य करावे; अन्यथा प्रतिबंधात्मक मोठे निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.