Pune Corona News : पुण्यातील कोविड रुग्णालयांसाठी 5900 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध

एमपीसीन्यूज : पुणे जिल्हा प्रशासनाने शहरातील कोविड रुग्णालयासाठी 5900 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिला असून शहरातील 511 कोविड रुग्णालयांना या साठ्याचे वाटप करण्यात आले आहे.

रुग्णालयातील एकूण बेड च्या तुलनेत 40 ते 70 टक्के प्रमाणात या इंजेक्शनचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी धावाधाव करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे पिंपरी-चिंचवड सह जिल्ह्यात एकूण 511 कोविड रुग्णालय आहेत. या रुग्णालयांमध्ये 12131 खाटांची क्षमता आहे. या सर्व रुग्णालयांना हा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या इंजेक्शनचे रुग्णालय निहाय वाटप सुरू करण्यात आले आहे. रुग्णालयांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या संख्येनुसार सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार इंजेक्शन प्राप्त करून घ्यावेत, असे आदेशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.