Pune Corona News : शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरचे पावसाळ्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट

एमपीसीन्यूज : शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचा सांगाडा सुस्थितीत असल्याचे प्रमाणापत्र दिल्ली आयआयटीकडून देण्यात आले आहे. त्यांनी ‘जम्बो’ला तीन महिन्यांची मुदत दिलेली होती. ही मुदत जून महिन्यात संपते आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पुन्हा एकदा या ‘जम्बो’चे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.

शहरातील रुग्ण कमी झाल्याने 15 जानेवारी रोजी शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. दिल्ली आयआयटीने सांगाड्याचे सुस्थितीविषयक प्रमाणपत्र दिल्यानंतर 22 मार्चपासून येथे प्रत्यक्ष रुग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात करण्यात आली.

शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेल्यानंतर या ‘जम्बो’मुळे दिलासा मिळाला. रुग्णालयाची क्षमता  700 खाटांपर्यंत वाढविण्यात आली. यापूर्वी महापालिका, पीएआरडीए आणि जिल्हा प्रशासनाच्या सहभागातून जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत जम्बोचे पूर्ण व्यवस्थापन महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

आयआयटी दिल्लीने जम्बोच्या सांगाड्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर तीन महिन्यांच्या सुस्थितीचे प्रमाणपत्र दिले होते. हे प्रमाणपत्र जूनपर्यंतचे असल्याने पुन्हा ऑडिट करून घ्यावे लागणार आहे. सांगाड्याची क्षमता नसेल तर ऐन पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

यासोबतच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यावेळीही जम्बोची आवश्यकता भासणारच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा हे ऑडिट केले जाणार असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला।हे काम सोपविले जाण्याची शक्यता आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जर जम्बोचा सांगाडा कमकुवत झाल्याचे आणि तो उतरवण्याची आवशक्यता निष्पन्न झालेच तर 700 रुग्णांना हलवायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे पालिकेला ‘प्लान बी’ तयार ठेवावा लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासन विचार करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.