Pune Corona News : ‘त्या’ चार ठिकाणी ‘मायक्रो कंटेंन्मेंट झोन’मध्ये स्वॅब सेंटर सुरू

एमपीसी न्यूज : नगर रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता आणि वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णसंख्या लक्षणीय वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. भविष्यात हे चार भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे (मायक्रो कंटेंमेंट झोन) म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. तुर्तास चार भागात स्वतंत्र स्वॅब सेंटर सुरू करण्यात आले आहेत.

कोरोनाची साथ अजून संपलेली नाही. त्यामुळे पुणेकरांनी मास्क, सॅनिटायजर आणि सुरक्षित वावर या करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे.

शहरातील करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क न घालणाऱ्या आणि सुरक्षित शारीरिक आंतरपालन इत्यादी नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाला पुणे महापलिका प्रशासनाकडून देण्यात येणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

गेल्या आठवड्यात 1300 च्या आसपास असलेली कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1800 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्हीटी दरही 4.6 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर गेला आहे. नगर रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता आणि वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रुग्णसंख्या वाढत आहेत.

त्यामुळे या ठिकाणी स्वॅब सेंटर म्हणजेच कोरोना चाचणी केंद्रे, चाचण्यांचे प्रमाण आणि केंद्रावरील कुशल मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून ससूनसह पालिकेच्या रुग्णालयात 1163 खाटा उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

खासगी रुग्णालयांत देखील कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र खाटा राखून ठेवण्याचे निर्देश पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like