Pune Corona News : शहरात आता अवघे 13 कंटेनमेंट झोन

एमपीसी न्यूज : पुणे शहरात आता कंटेंन्मेंट झोनची संख्या घटविण्यात आली असून एकेकाळी शंभरी पार केलेल्या झोनची संख्या अवघी 13 वर आली आहे. नव्याने मायक्रो कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करण्यात आली आहे. आज, बुधवारी महापालिका प्रशासनाने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची (मायक्रो कंटेंन्मेंट झोन) यादी प्रसिद्धी केली.

पुणे महापालिकेच्या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेंन्मेंट झोन) संदर्भात नवा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांचा यात समावेश करण्यात आला आहे.

त्यामध्ये शहर मध्यवर्ती भाग कसबा पेठ, गुरूवार पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडे पेठ, आंबेगाव बुद्रूक 15, 16 , चंद्रांगण सोसायटी, सिल्वर पार्क सोसायटी परिसर, कात्रज, संतोषनगर, वानवडी एस.आर.पी.एफ., लोहगाव, संतनगर, आदर्शनगर, पोरवाल रस्ता, निंबाळकर कॉलनी, स्प्रिंग सोसायटी, फुरसुंगी, भेकराई नगर, गोंधळेनगर, ससाणे नगर, कोथरूड, पोस्टमन कॉलनी, शास्त्री नगर, पी.एम.सी. कॉलनी, सागर कॉलनी, न्यू लोकमान्य वसाहत, सुतारदरा या भागांचा समावेश नव्या यादीत करण्यात आला आहे.

नव्याने तयार केलेल्या मायक्रो कंटेंन्मेंट झोनमध्ये माझे घर माझे कुटुंब मोहीमेअंतर्गत घरोघरी सर्वेक्षण, तपासणी आणि औषधोपचार दिला जात आहे. शहरातील महापालिकेच्या कोविड केयर सेंटर सोबतच सर्व रुग्णालयांमध्ये कोविड करीता स्वतंत्र मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.

जम्बो कोविड सेंटरमध्ये देखील करोना बाधितांची संख्या घटत असून शहरातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा हजारांच्या खाली आहे.

त्यामुळे मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या घटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी स्वतःसह कुटुंबाच्या काळजीसाठी मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करावे.

तसेच तीव्र किंवा सौम्य लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करून डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.