Pune corona News : पहिल्या दिवशी 18 ते 44 वयोगटातील 700 नागरिकांचे  लसीकरण  : महापौर 

एमपीसीन्यूज : पुण्यात आज 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कमला नेहरू आणि राजीव गांधी रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. या दोन्ही केंद्रावर नागरिकाची प्रचंड गर्दी पाहण्यास मिळत आहे.   पहिल्या दिवशी 700 नागरिकांचे  लसीकरण करण्यात  आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

महापौर  मोहोळ म्हणाले की, राज्यभरात आज 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे.

पुणे  शहरात देखील लसीकरण करण्यात येत आहे. पुण्यासाठी 18 ते 44 वयोगटासाठी  केवळ पाच हजार लशींचा पुरवठा करण्यात आला आहे. हे लसीकरण पुढील आठवड्याभर कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या दोन ठिकाणी केले जाणार आहे. त्यामुळे दररोज साधारण दोन्ही केंद्रावर प्रत्येकी 350 व्यक्तींना लस दिली जाणार आहे.

तसेच सध्याचा लशींचा   पुरवठा आणि नागरिकांची संख्या लक्षात घेता  प्रचंड लस तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सरकारने अधिकाधिक लसीचा पुरवठा केला पाहिजे. तसेच ज्या नागरिकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन  होऊन  लस घेण्याची तारीख मिळाली असेल त्याच नागरिकांनी केंद्रावर जावे, रजिस्ट्रेशन झाले म्हणून केंद्रावर जाऊ नये, असे आवाहनही  त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.