Pune Corona News : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफचे योगदान महत्वपूर्ण : अजित पवार

एमपीसीन्यूज : कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफसह पहिल्या फळीतील कोरोना योद्धयांचे योगदान महत्वपूर्ण आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या काळात वारजे-माळवाडी येथील कोविड सेंटरच्या माध्यमातून या भागातील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा-सुविधा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

वारजे-माळवाडी येथे नगरसेवक सचिन दोडके यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या 101 बेड क्षमतेच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटर’चे ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व यंत्रणांना युद्ध पातळीवर काम करावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यात येत आहे. नगरसेवक सचिन दोडके यांनी पुढाकार घेवून सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून वारजेसह आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होईल.

या सेंटरमुळे वारजे माळवाडीसह या परिसरातील रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा व दिलासा मिळेल, असे सांगून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाल्यावर या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड व्यवस्था होण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी कोविड सेंटरची सविस्तर माहिती घेतली. तसेच कोविड सेंटर सुरु झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.