Pune Corona News : कोरोना प्रतिबंधक लस ; पहिल्या टप्प्यात 50 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील सुमारे 50 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचण्यात येणार आहे. यासाठी आजपर्यंत सुमारे 31 हजार 721 कर्मचाऱ्यांनी अर्ज महापालिकेकडे दाखल झाले असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

पहिल्या टप्प्यात कोरोना बाधितांवर उपचार करणारे सरकारी, खासगी क्षेत्रातील डॉक्‍टर, परिचारिका आणि वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य अधिकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, सहायक आरोग्य कर्मचारी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात येणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लस विकसित होत असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीच्या वितरणाचे नियोजन सुरू केले आहे.

या संदर्भात पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या,लसीकरणाच्या नियोजनासाठी नुकतीच क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून शहरातील खासगी रुग्णालये आणि जनरल प्रॅक्‍टिशनर यांना त्यांची माहिती पाठवण्यासाठी पत्रे दिली आहेत.

ही माहिती केंद्राच्या लिंकवर अपलोड करण्यात येणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही माहिती राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III