Pune : सिम्बॉयोसिस रुग्णालयातही आता ‘कोरोना’वर उपचार; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आणखी वेगाने पावले उचलायला सुरुवात केली असून सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत महापालिकेने करार केला आहे. यामुळे कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असलेले विलगीकरणाचे 500 आणि अतिदक्षताचे 30 बेड्स उपलब्ध झाले आहेत’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे महापालिका आणि सिम्बॉयोसिस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असून लवळे येथील सिम्बॉयोसिस हॉस्पिटल आता महापालिका कोरोना उपचारांसाठी वापरणार आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाची यंत्रणा कमी पडल्यानंतर सिम्बॉयोसिस रुग्णालयात कोरोनाबाधितांना भर्ती केले जाणार आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘शहरात कोरोनाबाधितांची संख्या सद्यस्थितीत नियंत्रणात असली तरी भविष्यातील धोके आणि इतर देशात आलेले अनुभव लक्षात घेता हे पाऊल उचलले आहे. या रुग्णांवर होणाऱ्या उपचारांचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून केला जाणार आहे. शिवाय जे रुग्ण या योजनेला पात्र झाले नाही तर महापालिका संबंधित रुग्णाचा खर्च सीजीएचएस दराप्रमाणे अदा करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.