Pune: पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या 48 वर्षीय नर्सला ‘कोरोना’ची बाधा; ‘त्या’ रुग्णालयातील 30 नर्स क्वारंटाईनमध्ये

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या (पुण्याच्या) रुबी हॉस्पिटलमधील 48 वर्षीय नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. काही दिवस रजेवर असलेली ही नर्स तीन दिवसांपूर्वीच कामावर रुजू झाली होती.

दरम्यान, कामावर असताना तिला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर केलेल्या तपासणी अहवालात तिला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, या नर्सला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयातील 30 नर्सना क्वारंटाईनमध्ये  ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.