Pune : शहराच्या मध्यवर्ती भागात ‘कोरोना’चा रुग्ण; नागरिकांमध्ये घबराट

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून आल्याने घबराट निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ‘होम क्वारंटाईन’ केले आहे. तो राहत असलेल्या परिसरातील घरांचेही खबरदारीचा उपाय म्हणून सर्वेक्षण करण्यात आले आहे.

दुबई मार्गे हा रुग्ण दिनांक १५ मार्च रोजी मुंबई येथे आणि तेथून कॅबने याच दिवशी पुण्यात आला. दिनांक १७ मार्च डॉ. नायडू रूग्णालयात उपचारासाठी आला होता. हा रुग्ण राहत असलेल्या परिसरातील ५९ घरांंतील २३३ नागरिकांचे सर्वेक्षण करून तपासणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.