Pune: कोरोनाबाधित रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो, दगावण्याची शक्यता अत्यल्प- आयएमए

कोरोना विषाणूची साथ.... हे जाणून घेऊयात!

इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य
जनहितार्थ प्रसारित
कोरोना विषाणूची साथ…. हे जाणून घेऊयात!

काय आहे कोरोना?

  • हा एक विषाणू आहे.
  • तो वेगाने वाढतो
  • वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो
  • आपल्या श्वसनसंस्थेला बाधित करतो.

 

कोरोना विषाणू दोन प्रकारे पसरतो 
१. रुग्णाच्या खोकल्यातून 
  • रुग्ण खोकल्यावर हवेत तुषार उडतात
  • हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात
  • या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात
  • आजूबाजूच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यावर त्यातून त्याचा संसर्ग होतो.
२. वस्तूंच्या स्पशार्तून 
  • रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात
  • त्या वस्तूंना आपल्या हातांचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू हातांना चिकटतात
  • त्यानंतर जर हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावले तर ते आपल्या श्वसनमागार्तून जाऊन संसर्ग होतो.

 

आजाराची लक्षणे
 १. सर्दी
२. घसा तीव्रपणे दुखणे
३. खोकला
४. ताप
५. श्वास घेण्यास त्रास होणे
६. डोकेदुखी
७. उलट्या व जुलाब

 

धोकादायक लक्षणे 
१. तीव्र घसादुखी
२. ३८ अंशापेक्षा जास्त ताप असणे
३. धाप लागणे,
४. छातीत दुखणे,
५. खोकल्यावाटे रक्त पडणे,
६. रक्तदाब कमी होणे,
७. नखे निळसर काळी पडणे,
८. मुलांमध्ये चिडचीड आणि झोपाळूपणा वाढणे

 

जास्त धोका कोणाला? 
• गरोदर महिला
• उच्च रक्तदाब
• मधुमेह
• मूत्रपिंडाचे विकार
• कर्करोग
• दमा
• जुना व सतत बळावणारा खोकला
• कर्करोगाचे उपचार चालू असल्यास

 

आजाराची शंका आल्यास 
• वेळ न दवडता मान्यताप्रत डॉक्टरांचा सल्ला घ्या
• जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन ‘कोरोना विषाणू’च्या निदानाची तपासणी करून घ्या

• डॉक्टरांनी सांगितल्यास रुग्णालयात त्वरित भरती व्हा
• ऐकीव माहिती, अफवांवर विश्वास ठेवू नका
• अशास्त्रीय उपचार, भोंदू डॉक्टरांचे उपचार घेऊ नका

 

  आजार टाळण्यासाठी
• डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापरा
• गर्दीची ठिकाणे टाळा
• चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा
• सॅनिटायझर किंवा साध्या साबण-पाण्याने हात वरचेवर धुवावेत.
• खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावा.
• टिश्यू लगेच कचरापेटीत टाकून द्यावा.
• खोकताना किंवाा  शिंकताना तोंडासमोर हात धरू नये, त्याऐवजी कोपर वाकवून ते तोंडासमोर धरावे.
• ताप आणि खोकला असलेल्या रुग्णाचा सहवास टाळावा.
• तुम्ही या विषाणूने पसरलेल्या साथीच्या भागात प्रवास केला असेल आणि जर ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे.
• प्राण्यांचा सहवास टाळावा. त्यांना स्पर्श करू नये.
• पूर्ण शिजवलेले शाकाहारी/ मांसाहारी अन्न खावे
• चिकन, मटण प्रमाणित दुकानातूनच घ्यावे
• तीन लिटर पाणी रोज प्यावे.
• पुरेशी आणि नियमित झोप घ्यावी, जागरणे टाळावीत
• धूम्रपान टाळावे
• मद्यपान टाळावे

 

कोरोनाबाबत गैरसमज 
१. चिकन, अंडी खाऊ नयेत 
  • हे धादांत खोटे आहे
  • पूर्ण शिजवलेल्या मांसाहारातून कोरोना व्हायरस पसरू शकत नाही.
  • 55 अंशापेक्षा अधिक तापमानात हा विषाणू जिवंत राहत नाही
 २. चीनमधून आयात झालेल्या वस्तू वापरू नयेत.
  • आयात वस्तुंमधून विषाणू पसरत नाही
  • तरीही शंका असल्यास जंतुनाशक औषधांनी त्या धुवून घ्याव्यात
  • चीनमधून आयात उपकरणे, रंग, पिचकाऱ्या, पुस्तके यातूनही कोरोना विषाणू पसरत नाही
  • शंका असल्यास निर्जंतुक हातमोजे वापरावेत
३. लसूण खाल्याने कोरोना विषाणूंचा संसर्ग होत नाही 
  • हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे.
  • यासाठी कोणतेही संशोधन अस्तित्वात नाही.
  • अशाप्रकारची कोणतीही वनस्पती अथवा औषध आजमितीला शास्त्रीय पद्धतीने मान्यताप्राप्त नाही
४. भारत सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार काही ‘आयुष’ औषधे कोरोना आजार रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात.
  • कोणताही शास्त्रीय पुरावा नसलेली औषधे सरकारच्या जबाबदार खात्याने प्रतिबंधात्मक औषधे म्हणून जाहीर केली, हे दुर्दैव आहे.
  • ‘आयुष’ मंत्रालयाने जाहीर केलेली ही औषधे हा आजार रोखण्यासाठी मुळीच उपयुक्त नाहीत.
५. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास रुग्ण मृत्युमुखी पडतो. 
  • आज भारतभरात केंद्र सरकारने आणि महाराष्ट्रात राज्य सरकारच्या आरोग्यखात्याने, त्याप्रमाणे आयएमएच्या सदस्य डॉक्टरांनी अगदी पहिल्या दिवसापासून हा आजार ओळखून त्याचे निदान त्वरित करून रुग्णाला आवश्यक असल्यास त्याला रुग्णालयात भरती करण्याबद्दल मोहीम राबवली आहे.
  • कोरोना विषाणूची बाधा झाली तरी रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.
  • यात रुग्ण दगावण्याची शक्यता अत्यल्प आहे.
  लक्षात ठेवा 
• कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली तर घाबरु नका.
• त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
• अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका
• कोरोना विषाणूची साथ लवकरच पूर्ण आटोक्यात येईल.

 

संबंधित बातम्या वाचा….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.