Pune : शहरात नवे 59 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 501, मृतांचा आकडा 47 वर

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. शहरात आज कोरोनाचे 59 नवे रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 501 झाली आहे. कोरोनाबाधित तीन रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा 47 झाला आहे. 

नव्या रुग्णांपैकी 40 जण डॉ. नायडू रुग्णालयात, 14 जण ससून रुग्णालयात, रुबी हॉल क्लिनिकमध्ये चारजण तर कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात एकजण उपचार घेत आहे. शहरात आज चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डॉ. नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. चौघांचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

विशेष म्हणजे शहराच्या दाटीवाटीच्या परिसरात या रोगाचे रुग्ण सातत्याने वाढतच आहेत. पुणे शहरात या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 47 झाली आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी अर्धे पुणे सील करण्यात आले आहे. पोलिसांनी संचारबंदीही लागू केली आहे. पण, उत्साही नागरिक घरी थांबायला तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या उत्साही नागरिकांवर कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे.

पुणे शहरातील दाटीवाटीने असलेल्या भागात कोरोना झपाट्याने वाढत आहेत. यामध्ये भवानी पेठेत 100 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर येथे 12 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे.

त्या खालोखाल ढोले – पाटील रोड येथे 50, कसबा – विश्रामबागवाडा येथे 53 कोरोना रुग्ण आहेत. शहरातील येरवडा, धानोरी, शिवाजीनगर, सहकारनगर, कोंढवा, धनकवडी, मुंढवा, हडपसर, वारजे – कर्वेनगर भागातही कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत.

रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या रुग्णांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मधुमेह, किडनी असणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा रुग्णांनीही विशेष खबरदारी बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

पुणे शहरातील विभागनिहाय कोरोनाबळींची आकडेवारी

भवानी पेठ 118 रुग्ण, तर तब्बल 15 जणांचा बळी गेला आहे. ढोले पाटील रोड 57, कसबा – विश्रामबाग वाडा 51, येरवडा – धानोरी 43, शिवाजीनगर – घोले रोड 28, वानवडी – रामटेकडी 24, धनकवडी – सहकारनगर 27, हडपसर – मुंढवा 21, बिबवेवाडी 17, वारजे – कर्वेनगर 9, कोंढवा – येवलेवाडी 9, सिहगड रोड 8, नगररोड – वडगावशेरी 6, औंध – बाणेर 3, कोथरूड – बावधन 1 असे रुग्ण आहेत. तर, कसबा आणि वानवडी भागात प्रत्येकी 5, ढोले पाटील रोड, येरवडा, हडपसर भागांत प्रत्येकी 3 असे कोरोनाचे बळी गेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.