Pune : ‘कोरोना’मुळे पुणे महापौर चषक स्पर्धा स्थगित

एमपीसी न्यूज – पुणे शहरात ‘कोरोना’चे रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेला नागरिकांची आणि क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

या चषक अंतर्गत यंदा ३६ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येत होती. त्यातील साधारण निम्म्या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा पूर्ण झालेल्या आहेत.

मात्र, उरलेल्या स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आल्या आहेत. नजीकच्या काळात या स्पर्धा घेण्याचा विचार आहे, असेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.