Pune : सर्वोपक्षीय नगरसेवकांनी घेतला कोरोनाचा धसका; गॅलरीतून प्रेक्षकही गायब

एमपीसी न्यूज – पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्याचा धसका सर्वोपक्षीय नगरसेवकांनी घेतल्याचे चित्र सभागृहात दिसून आले.

सोमवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभेला काही मोजक्याच नगरसेवकांची उपस्थिती होती. जेष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, डॉ. देसाई यांच्या निधनामुळे ही सभा दिनांक 18 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

तर, विशेष म्हणजे प्रेक्षक गॅलरीत सातत्याने गर्दी असते. आज मात्र प्रेक्षकच गायब झाल्याचे दिसून आले. सर्वांनीच कोरोनाचा धसका घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

या सर्वसाधारण सभेत कोणत्याही नगरसेवकांनी कोरोना संदर्भात प्रश्न उपस्थित न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.