Pune : विभागातील कोरोनाबाधितांनी ओलांडला एका लाखाचा टप्पा

Corona sufferers in the division crossed the one lakh mark : कोरोना बाधित एकूण 1 लाख 3 हजार 411 रुग्ण; 62 हजार 370 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 62 हजार 370 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 411 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 271 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 21 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.31 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

शुक्रवारी (दि. 31) दुपारी तीन वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत विभागामध्ये एकुण 5 लाख 1 हजार 356 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 95 हजार 680 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 3 हजार 411 नमून्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आहे.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 754 ने वाढ झाली आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 825, सातारा जिल्ह्यात 162 , सोलापूर जिल्ह्यात 204, सांगली जिल्ह्यात 222 तर कोल्हापूर जिल्ह्यात 341 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील 82 हजार 924 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 52 हजार 450 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 542 आहे.

यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 19 हजार 170, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 822, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 105 , पुणे कॅन्टोंन्मेंट 144, खडकी विभागातील 20, ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 281, यांच्याकडील रुग्णांचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 932 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 315, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 350, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 58, पुणे कॅन्टोंन्मेंट 31 , खडकी विभागातील 41 , व ग्रामीण क्षेत्रातील 137, रुग्णांचा समावेश आहे. तसेच 738 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.25 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 824 रुग्ण असून 1 हजार 982 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 713 आहे. कोरोनाबाधित एकूण 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील 8 हजार 443 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 817 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 143 आहे. कोरोना बाधित एकूण 483 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 169 रुग्ण असून 612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 487 आहे. कोरोना बाधित एकूण 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील 6 हजार 51 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 509 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 386 आहे. कोरोना बाधित एकूण 156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.