Pune :  कोरोना संशयित रुग्णाची हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या 

एमपीसीन्यूज  :  एका कोरोना संशयित रुग्णाने  हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बोपोडी येथे उघडकीस आली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात सायंकाळी सातच्या सुमारास घडली घटना. आत्महत्या केलेल्या तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात आणले होते. आज दुपारी तपासणीसाठी त्याचे स्वब घेतला होता. त्यामुळे  तो तणावग्रस्त होता.

त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास बाथरूमला जायचे असे सांगून बाहेर पडला आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच   तपास सुरू केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.