Pune: महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्यप्रमुख आदींचे कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह

Pune: Corona test report of Municipal Commissioner, Additional Commissioner, Health Chief etc. is negative शेखर गायकवाड, रुबल अग्रवाल, डॉ. रामचंद्र हंकारे, मनीषा नाईक व निशा चव्हाण या पाचही जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहाय्यक आरोग्य अधिकारी मनीषा नाईक आणि विधी विभागाच्या अधिकारी निशा चव्हाण या पाचही जणांचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी रात्री निगेटिव्ह आला. त्यामुळे हे अधिकारी आता कोरोनाच्या संकट काळात आणखी जोमाने काम करणार आहेत. 

महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांनी ‘वर्क फॉर्म होम’ सुरू केले होते. आता रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हे वरिष्ठ अधिकारी आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. कोरोनाच्या तावडीतून कोणाचीही सुटका झाली नाही. पुणे महापालिकेच्या नागरसेवकांनाही मोठ्या प्रमाणात कोरोना होत आहे. आमदार मुक्ता टिळक, माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोना झाला आहे.

पुणे शहरात 23 हजार 21 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याने रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्कात शेवटपर्यंत काही वरिष्ठ अधिकारी होते. त्या सर्वांची कोरोना टेस्ट आता निगेटिव्ह आल्याने अनेक अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like