Pune : महापालिकेच्या 48 कर्मचाऱ्यांना कोरोना ; 5 जणांचा मृत्यू

0

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाने हाहाकार माजविला असून दररोज 200 च्या वर रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या तब्बल 48 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 5 जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली आहे. 31 मे पर्यंत ही संख्या 5 हजार होणार असल्याचा अंदाज आहे. त्या दृष्टीने महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. शहरातील 22 पोलिसांनाही कोरोना झाला असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

पोलीस, डॉक्टर,, आरोग्य, महापालिका, जिल्हा प्रशासन रात्रंदिवस कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, हा रोग वाढतच आहे. प्रशासकीय यंत्रणा जीव ओतून काम करीत असताना शहरातील राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर टीकाटिप्पणी, आंदोलन करीत आहेत. त्यामुळे अधिकारी – कर्मचारी यांच्यामध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनामुळे गुरुवारी 7 जणांचा मृत्यू झाला. तर, 208 नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत या रोगामुळे पुणे शहरात 227 जण दगावले. कोरोनाचे एकूण रुग्ण 4 हजार 107 रुग्ण झाले असून, 159 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या आजारातून बरे झालेले 2 हजार 182 रुग्ण आहेत. सध्या 1 हजार 6898 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 169 जण गंभीर रुग्ण आहेत. तर, 44 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

पुणे जिल्हयात 4 हजार 717 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 363 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 114 आहे. कोरोनाबाधित एकूण 240 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 192 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. आज 192 नवीन कोरोना रुग्ण आढळले.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावे. तर, दुसरीकडे या रोगातून मुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. सध्या कोरोनाचा चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like