Pune : ‘कोरोना’ प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी इन्फ्रास्ट्रकचर उभारा -दिलीप काळोखे

एमपीसी न्यूज – सध्या कोरोना विषाणूचा फैलाव सुरु आहे. हा प्रसार रोखण्याकरिता सर्व शासकीय यंत्रणा जोमाने काम करीत आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार प्रामुख्याने रोखण्याकरिता आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी निधीची गरज आहे. याकरिता सर्व नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात विकासकामे करण्याकरिता चालु अंदाजपत्रकातील जी तरतूद आहे. त्यातील 25% रक्कम कोरोना विषाणू्चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि इन्फ्रास्ट्रकचर उभारणीकरिता प्राधान्याने वर्ग करून घ्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक दिलीप काळोखे यांनी केली आहे.

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, महापालिका आयुक्त यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व कचरउभारणीमध्ये आवश्यक कामे प्राधान्याने करावीत.

मनपा दवाखाने, अद्यावत करणे, आयसोलेसन वार्ड उभारणी, आयसीयू उभारणी, आवश्यक उपकरणे बसविणे, दवाखान्यामधील कर्मचारी वर्ग करिता सूरक्षा साधने खरेदी करण्यासाठी हा निधी आवश्यक असल्याचे दिलीप काळोखे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.