Pune Corona Update: 1 हजार 60 रुग्ण कोरोनामुक्त, 969 नवे रुग्ण तर 22  जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात मागील 8 दिवसांपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले आहे. या आजरातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी (दि. 7 ऑक्टोबर) तब्बल 1 हजार 60 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 लाख 33 हजार 600  नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

आज 5 हजार 438  कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 969 नवे रुग्ण आढळले. 22 जणांचा मृत्यू झाला.  कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 51  हजार 402 रुग्ण झाले आहेत.

आतापर्यंत या रोगामुळे 3 हजार 731 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14  हजार 71 सक्रिय रुग्ण आहेत. 908 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 493 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने आणि मार्केटमध्ये येत असलेले नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन अतिशय महत्वपूर्ण आहे. त्याचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.