Pune Corona Update : पुण्यात 1021 नवे रुग्ण ; 2892 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत आहे. आजही नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या दुपटीहून अधिक आहे. आज, दिवसभरात शहरात नव्याने 1021 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 2 हजार 892 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 68  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर पुण्याबाहेरील 22  रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 9 हजार 258 इतकी झाली आहे. शहरात 1364  गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 61 हजार 008 इतकी झाली आहे.  पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 36 हजार 690  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज दिवसभरात 9258  इतके, तर आतापर्यंत एकूण 23 लाख 81  हजार 292  जणांचे स्वॅब टेस्टसाठीचे नमुने घेण्यात आले.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.