एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (शुक्रवारी) नव्याने 109 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 167 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 500494 इतकी तर एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 90 हजार 059 झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 1 हजार 413 रुग्णांपैकी 182 रुग्ण गंभीर तर 227 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
पुणे महापालिका हद्दीत नव्याने 02 कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 9 हजार 022 इतकी झाली आहे. शहरात आज एकाच दिवसात 05 हजार 937 नमुने घेण्यात आले आहेत.
नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.