Pune Corona Update: 1160 नवे रुग्ण, 896 जणांचा डिस्चार्ज तर 16 मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (सोमवारी) नव्याने 1,160 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 49 हजार 217 झाली आहे. तर 896 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 18 हजार 546 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आज 16 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. 

_MPC_DIR_MPU_II

शहरातील आतापर्यंत एकूण 2 लाख 48 हजार 514 कोरोना चाचण्या झाल्या असून असून आज 4 हजार 467 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या. शहरात आतापर्यंत 29 हजार 489 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरात आणखी 16 कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले असून यात ससून 5, DMH 3, भारती 2, नवले 1 , पूना 1, सह्याद्री 1, सिम्बायोसिस 1, माई मंगेशकर 1 आणि D.H.AUNDH 1 अशा तपशील आहे. सदरील मृत्यू 23 ते 27 जुलै दरम्यानचे आहेत. या मृत्यूंची आज नोंद करण्यात आली. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित मृतांचा एकूण आकडा 1,182 वर जाऊन पोहचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.