Pune Corona Update: 1243 नागरिक कोरोनामुक्त, 1225  नवे रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात येत असून, रविवारी तब्बल 1243 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 4  हजार 868 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1225 नवे रुग्ण आढळले. 38 जणांचा मृत्यू झाला.

कोरोनाचे पुणे शहरात 83 हजार 395 रुग्ण झाले आहेत. 66 हजार 589 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 988  नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 818 सक्रिय रुग्ण आहेत. 803 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 493 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

हडपसरमधील 61 वर्षीय महिलेचा, येरवड्यातील 70 वर्षीय पुरुषाचा दळवी हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 75 वर्षीय पुरुषाचा इनामदार हॉस्पिटलमध्ये, वडगाव बुद्रुकमधील 65 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 72 वर्षीय पुरुषाचा, कसबा पेठेतील 66 वर्षीय महिलेचा, मंगळवार पेठेतील 78 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, वडगावमधील 48 वर्षीय पुरुषाचा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

सदाशिव पेठेतील 93 वर्षीय महिलेचा पूना हॉस्पिटलमध्ये, मुंढव्यातील 75 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 59 वर्षीय महिलेचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 70 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, धनकवडीतील 70 वर्षीय महिलेचा, विश्रांतवाडीतील 31 वर्षीय महिलेचा, नाना पेठेतील 28 वर्षीय पुरुषाचा, उत्तमनगरमधील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

घोरपडी पेठेतील 89 वर्षीय पुरुषाचा, फुरसुंगीतील 55 वर्षीय महिलेचा, आंबेगावमधील 44 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 87 वर्षीय पुरुषाचा, गंजपेठेतील 74 वर्षीय महिलेचा, वारजेतील 66 वर्षीय महिलेचा, शिवाजीनगरमधील 70 वर्षीय महिलेचा, बिबवेवाडीतील 70 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, वडगावशेरीतील 80 वर्षीय पुरुषाचा, सदाशिव पेठेतील 82 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 51 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 35 वर्षीय महिलेचा, कोंढाव्यातील 53 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोथरूडमधील 73 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 57 वर्षीय महिलेचा, शंकरनगरमधील 78 वर्षीय पुरुषाचा, रास्ता पेठेतील 76 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 58 वर्षीय पुरुषाचा, एरंडवणेतील 85 वर्षीय महिलेचा, धायरीतील 65 वर्षीय पुरुषाचा, वडगाव बुद्रुकमधील 77 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 60 वर्षीय पुरुषाचा सना हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.