pune corona update : 1328 रुग्ण कोरोनामुक्त, 1512 नवे रुग्ण, 42 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात गुरुवारी (दि. 24 सप्टेंबर) तब्बल 1328 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 लाख 16 हजार 626 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. आज 5 हजार 642 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1512 नवे रुग्ण आढळले. 42 जणांचा मृत्यू झाला.

शहरात सध्या 957 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 499 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 37 हजार 330 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 3 हजार 255 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 449 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या आणखी वाढ करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरातील कोरोनाचे संकट आणखीनच गंभीर होत चालले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारां विरोधात कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे पथके स्थापन करण्यात आली आहेत.

दुकाने आणि मार्केटमध्ये येत असलेले नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळोवेळी बजावण्यात आलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.