Pune Corona Update : दिवसभरात 139 रुग्णांना डिस्चार्ज तर नवे 244 कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (गुरुवारी) नव्याने 244 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 139 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

नव्या संख्येसह शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 77 हजार 048 झाली आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 4 लाख 88 हजार 293 इतकी झाली आहे.

शहरात उपचार घेत असलेल्यांपैकी 209 रुग्ण गंभीर आहेत. तर पुण्यात 11 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 06 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 797 इतकी झाली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2448 इतकी झाली आहे.

शहरात आज एकाच दिवसात 8 हजार 469 नमुने घेण्यात आले आहेत.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.