Pune Corona Update : पुण्यात 140 नवे रुग्ण ; 144 जणांना डिस्चार्ज

0

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि उपनगरात आज नवे 140 रुग्ण सापडले. तर 214 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

शहरातील कंटेंन्मेंट झोनची संख्या शुन्यावर आली आहे. येत्या 15 जानेवारीपासून शिवाजीनगर सीओईपी मैदानावर जम्बो कोविड सेंटर तात्पुरत्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड केयर सेंटर सुरु आहेत.

त्यामध्ये एकूण 2 हजार 682 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 213 रुग्ण गंभीर असून 311 जण ऑक्सिजन बेडवर आहेत. आज कोरोनामुळे पुण्यात 3 जण दगावले आहेत. आतापर्यंत पुण्यात 1 लाख 74 हजार 287 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तरीही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पुणेकरांनी निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना, विविध ठिकाणी वावरताना मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरु करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.