Pune Corona Update : 1408 रुग्ण कोरोनामुक्त, 1627 नवे रुग्ण, 43 जणांचा मृत्यू

शहरात 1 हजार 40 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 530 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, बुधवारी तब्बल 1408 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 6 हजार 215 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1627 नवे रुग्ण आढळले. 43 जणांचा मृत्यू झाला.

शहरात 1 हजार 40 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 530 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 98 हजार 695 रुग्ण झाले आहेत. 80 हजार 897 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या रोगामुळे 2 हजार 375 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 423 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

वडगांवशेरीतील 70 वर्षीय महिलेचा कमांड हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 78 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 64 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, पर्वतीमधील 83 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 71 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, वडगावशेरीतील 50 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 61 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 60 वर्षीय महिलेचा, कसबा पेठेतील 75 वर्षीय पुरुषाचा, शिवाजीनगरमधील 67 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 73 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोंढव्यातील 65 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 68 वर्षीय पुरुषाचा, उंडरी गावातील 55 वर्षीय पुरुषाचा, घोरपडी गावातील 64 वर्षीय महिलेचा, रास्ता पेठेतील 37 वर्षीय महिलेचा, येरवड्यातील 55 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 86 वर्षीय पुरुषाचा, रामवाडीतील 59 वर्षीय पुरुषाचा, धायरीतील 69 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

नाना पेठेतील 58 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 52 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 69 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 62 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, भवानी पेठेतील 65 वर्षीय पुरुषाचा N. M. वाडिया हॉस्पिटलमध्ये, औंधमधील 76 वर्षीय पुरुषाचा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये, मार्केटयार्डमधील 53 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 58 वर्षीय महिलेचा, शनिवार पेठेतील 47 वर्षीय महिलेचा, येरवड्यातील 65 वर्षीय पुरुषाचा, तडीवाला रोडवरील 54 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोंढव्यातील 87 वर्षीय पुरुषाचा रत्ना हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 85 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 63 वर्षीय महिलेचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, कोंढव्यातील 64 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 46 वर्षीय महिलेचा रत्ना हॉस्पिटलमध्ये, स्यालीसबरी पार्कमधील 59 वर्षीय महिलेचा पुणे अडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोथरूडमधील 69 वर्षीय महिलेचा भाकरे हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 60 वर्षीय पुरुषाचा देवयानी हॉस्पिटलमध्ये, विश्रांतवाडीतील 78 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 60 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कोंढव्यातील 60 वर्षीय पुरुषाचा लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 59 वर्षीय पुरुषाचा परमार हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.