Pune Corona Update: 1428 रुग्ण कोरोनामुक्त, 993 नवे रुग्ण तर 38 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांपेक्षा या आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. रविवारी (दि. 4  ऑक्टोबर) तब्बल 1428 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 लाख 30 हजार 353 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

आज 4 हजार 580 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 993 नवे रुग्ण आढळले. 38 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 49 हजार 399 रुग्ण झाले आहेत.

आतापर्यंत या रोगामुळे 3 हजार 647 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 399 सक्रिय रुग्ण आहेत. 899 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 504 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने आणि मार्केटमध्ये येत असलेले नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन अतिशय महत्वपूर्ण आहे. त्याचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांनी स्वतः गरजू नातेवाईकांना हे इंजेक्शन स्वस्त दरात उपलब्ध करून दिले आहे. कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालयात त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.